TRAI : महागडे रिचार्ज प्लॅन संपणार ! ट्रायने अनिवार्य केला 10 रुपयांचा रिचार्ज आणि 365 दिवसांची वैधता

0
2
trai news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

TRAI : देशभरातील 120 कोटींहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांसाठी टेलिकॉम नियामक संस्था ट्रायने (TRAI) महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना महागड्या रिचार्ज प्लॅन्सपासून सुटका होणार असून, त्यांचा मोबाईल वापर आणखी सोयीस्कर आणि परवडणारा होईल.

ट्रायच्या नव्या नियमांची मुख्य वैशिष्ट्ये (TRAI)

फीचर फोनसाठी खास टॅरिफ व्हाउचर (STV)

आता 2G फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वॉइस आणि एसएमएस सेवांसाठी खास टॅरिफ व्हाउचर (STV) अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील, वयोवृद्ध तसेच केवळ वॉइस आणि एसएमएस सेवांचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.

365 दिवसांची वैधता (TRAI)

STV व्हाउचरची वैधता आता 90 दिवसांवरून वाढवून 365 दिवस (एक वर्ष) करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही आणि दीर्घकालीन प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

कलर कोडिंगची समाप्ती

ऑनलाइन रिचार्जच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे फिजिकल व्हाउचर्सवरील कलर कोडिंग पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रिचार्ज प्रकारांसाठी वेगवेगळ्या रंगांच्या कोडिंगची (TRAI) गरज राहणार नाही, आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल.

10 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरमध्ये बदल

वॉइस आणि एसएमएस सेवांचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आता परवडणारे आणि सुलभ रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होणार आहेत
खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी जुलै महिन्यात रिचार्ज प्लॅन्स महाग केल्यानंतर दोन सिम कार्ड आणि फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ट्रायच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महागड्या रिचार्ज प्लॅन्समधून सुटका मिळणार आहे.

10 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरची आवश्यकता कायम ठेवली आहे. मात्र, यासोबतच टेलिकॉम कंपन्यांना विविध मूल्यवर्गातील टॉप-अप व्हाउचर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

ग्राहकांना होणारे फायदे

नव्या नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्या विविध मूल्यवर्गातील टॉप-अप व्हाउचर बाजारात आणू शकतात. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे सोपे होईल. ट्रायच्या या निर्णयांमुळे ग्राहकांचा मोबाईल वापर अधिक किफायतशीर आणि सोपा होणार आहे, असा विश्वास आहे.