हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल फोन्स कॉलच्या बाबत खूप जास्त मोठ्या प्रमाणात फ्रॉड व्हायला लागलेला आहे. त्यामुळे नको असलेले हे फ्रॉड कॉल रोखण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले गेलेले आहेत. परंतु त्याने काहीही मदत झाली नाही. त्याचप्रमाणे एक नवीन AI फीचर देखील आणलं होतं. परंतु त्यांनी देखील हे फ्रॉड रोखण्यापासून जास्त मदत झाली नाही. अशातच आता टेलिकॉम रेगुलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI , 1 सप्टेंबर 2024 पासून एक नवीन नियम लागू करणार आहे. ज्यामुळे आता ग्राहक हे फसवे कॉल आणि लिंक्स यापासून लांब राहणार आहे. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक नुकसान होणार नाही. हा नियम 1 सप्टेंबर पासून देशभरातील मोबाईल युजर्ससाठी लागू होणार आहे. या अशा आता टेली मार्केट्सना ब्लॅक लिस्ट देखील केली जाणार आहे.
TRAI याबाबत टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्स एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्हीआय यांच्यासह टेली मार्केट मधील सोबत 8 ऑगस्ट रोजी मीटिंग घेतल्या. आणि या मीटिंगमध्ये मार्केटिंगच्या कॉल संदर्भात देखील निर्देश जारी करण्यात आलेले आहे. जर एखादी संस्था स्पॅम कॉल करण्यासाठी त्यांच्या लायसन्स गैरवापर करत असेल, तर त्यांना डिरेक्ट ब्लॅक लिस्ट केले जाणार आहे. असे सांगण्यात आलेले आहे.
ही माहिती दूरसंचार सेवा प्रदा त्याद्वारे पीएसपी इतर सर्व टीएसपी यांना शेअर केली जाईल. यासाठी सर्व दूरसंचार संसाधने दोन वर्षाच्या काळासाठी ब्लॅकलिस्ट देखील केली जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही या फसव्या कॉलपासून सावध राहू शकता. त्याचप्रमाणे ब्लॅक लिस्टिंगच्या काळात कोणत्याही टीएसपीला नवीन स्थूलसने संचार संसाधने दिली जाणार नाही. जर एखाद्या मेसेजमध्ये स्पॅम युआरएल किंवा एपीके फाईल असतील, तर ते कोणत्या मेसेजला पाठवण्याची परवानगी आता मिळणार नाही. आणि हा नियम 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर आणि टेली मार्केटर चेन बाईडींगची अंमलबजावणी करण्यासाठी आता 31 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला जाणार आहे.