Train Accident : वाराणसीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसची (Train Accident) जेसीबीला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे जेसीबीचा चक्का चूर झाला आहे तर ट्रेनच्या इंजिनचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेसीबीच्या मदतीने ट्रॅकच्या शेजारची झाडं झुडपं काढण्याचं काम सुरू होतं. मात्र जेसीबी हा रूळ ओलांडून पलीकडे जात असताना हा अपघात (Train Accident) झाल्याचा समजते आहे. शिवाय हा अपघात रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
Train no. 12168 jcb aur train accident#IndianRailways #IRCTC #railwayminister pic.twitter.com/c1qZCYTOf2
— Rahul Singh (@RamjiSingh5096) February 18, 2024
ही धडक इतकी जबरदस्त होती की मोठा आवाज आला आणि त्यानंतर जेसीबी मध्ये असलेला ड्रायव्हर हा काही अंतरावर उडून पडला. मोठा आवाज आल्यामुळे रेल्वेमधील प्रवाशांमध्ये सुद्धा गोंधळ, घबराहट निर्माण झाली आणि त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेमधून (Train Accident) उड्या सुद्धा टाकल्याची माहिती आहे.
डी डी यू टर्मिनल च्या व्यास नगर रेल्वे फाटकाजवळ (Train Accident) ही घटना घडली असून जेसीबी रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असतानाच ट्रेनची जोरदार धडक बसली. या घटनेमध्ये रेल्वे रुळावरून घसरली नाही पण रेल्वेची जेसीबीला जबरदस्त धडक बसल्यामुळे प्रवाशात मात्र खळबळ उडाली. या घटनेनंतर घटनास्थळी अधिकारी उपस्थित झाले त्यानंतर जेसीबी ट्रॅक वरून हटवण्यातआला. दरम्यान इतका मोठा अपघात घडन्यामागे रेल्वे ट्रॅक वर कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा असल्याचे सांगितले जात आहे