Train Accident : उत्तर प्रदेशात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले ; एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Train Accident : नुकत्याच आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. ट्रेन क्रमांक १५९०४ चंदीगडहून आसाममधील दिब्रुगडला जात होती. त्यादरम्यान हा (Train Accident) अपघात झाला आहे.

मदतकार्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ट्रेन मधील इतरप्रवासी त्यांचे सामान घेऊन ट्रॅकच्या बाजूला उभे आहेत. अचानक झालेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला असून अनेक प्रवाशांनी अपघातानंतर ट्रेनमधून बाहेर आल्याची माहिती आहे. 12 डब्यांपैकी एसी डब्यातील चार डबे झुलाही रेल्वे स्थानकाच्या काही किलोमीटर आधी रुळावरून घसरले. या अपघातामुळे या मार्गावरन जाणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम झाला असून काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तर पूर्व रेल्वेचे सीपीआरओ पंकज सिंग यांनी एका माध्यमाशी (Train Accident) बोलताना दिली आहे.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघाताची माहिती दिली असून अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देश (Train Accident) दिले आहेत, असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रेल्वे मेडिकल कॅन साइटवर पोहोचले आहे आणि ईशान्य रेल्वेने हेल्पलाइन (Train Accident) क्रमांक जारी केले आहेत:

Commercial Control: 9957555984

  • Furkating (FKG): 9957555966
  • Mariani (MXN): 6001882410
  • Simalguri (SLGR): 8789543798
  • Tinsukia (NTSK): 9957555959
  • Dibrugarh (DBRG): 9957555960
    Lucknow – 8957409292
    Gonda – 8957400965