इंदापूरात विमान कोसळले; महिला पायलट जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे हे विमान कोसळलं आहे. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाल्या असून शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

हाती आलेल्या माहितीनुसार, बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, अचानक या विमानातील इंधन संपले आणि ते इंदपूर तालुक्यातील कडबनवाडी येथील एका मक्क्याच्या शेतात कोसळले. दरम्यान, विमान कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती येथील कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. ग्लायडर विमान चालवताना प्रशिक्षित चालक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघे विमानात असणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत एकटी प्रशिक्षणार्थी तरुणी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.