Travel In Maharashtra | महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यटन वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. जी पर्यटन स्थळ पाहायला देश-विदेशातून माणसे येत असतात. नुकतेच उन्हाळ्याला सुट्टी लागलेली आहे. अशा वेळी लहान मुलं नेहमीच बाहेर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी हट्ट करतात. जर तुम्ही देखील या उन्हाळ्यात बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल, पण तुमचे बजेट जास्त नसेल आणि तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचे असेल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणार आहोत. जी पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आपण महाराष्ट्रातच आहोत. तिथे गेल्यावर तुम्हाला अत्यंत शांत आणि आनंदी वाटेल.
भंडारदरा
महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील हे भंडारदरा हे एक सुंदर ठिकाण आहे. भंडारदरा या ठिकाणी हिरवेगार पर्वत, धबधबे आणि सुंदर वनस्पती आहेत. हे ठिकाण मुंबईपासून केवळ 160 किलोमीटर आणि इगतपुरी हिल स्टेशनपासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक पर्यटक इथे भेट द्यायला येत असतात. येथील निसर्ग तुमच्या मनाला शांती देईल. यामध्ये ऑर्थर लेक, रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल्स , विल्सन डॅम यांसारख्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
म्हैसमाळ | Travel In Maharashtra
महाराष्ट्रातील (Travel In Maharashtra) औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत हिरवेगार असलेले म्हैसमाळ हे एक हिल स्टेशन आहे. हे स्थळ धार्मिक स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे अनेक नैसर्गिक आणि धार्मिक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. हे एक गुप्त ठिकाण आहे. तिथे येऊन तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल. अनेक पर्वतांनी हिरव्यागार झाडांनी हे ठिकाण घेतलेले आहे. या ठिकाणी देवीगिरी मंदिर, बालाजी मंदिर यांसारखी स्थळे आहेत.
तापोळा – महाराष्ट्रातील मिनी काश्मीर
तुम्हाला जर महाराष्ट्रातील काश्मीरचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला तापोळ्याला एकदा नक्की भेट द्यावी लागेल. हे ठिकाण मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते . महाबळेश्वरपासून केवळ 28 किलोमीटर अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. या गावात ट्रेकिंग ट्रेन्स पासून कॅम्पिंग साईटपर्यंत तलावापासून पर्वतांपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत. अनेक लोक या ठिकाणाला भेट देत असतात.
मोराची चिंचोली
तुम्हालाही असणारा मोल पहायचा असेल, तर तुम्हाला मोराची चिंचोलीमध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावर शेतात मोर नाचताना दिसतात. मोरा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याची प्रजाती क्वचितच आढळते. परंतु या ठिकाणी अनेक मोर आहेत. आणि त्या रंगीबेरंगी त्यांचा पिसारा फुलून नाचत असतात. त्याचप्रमाणे येथील वातावरण अत्यंत निसर्गरम्य आणि शांत आहे पुण्यापासून केवळ 55 किलोमीटर अंतरावर ती हे ठिकाण आहे.
चिखलदरा
पर्यटकांसाठी इतिहास निसर्ग आणि धर्म यांचा संगम असलेले चिखलदरा एक अतिशय लोकप्रिय स्थळ आहे. हे ठिकाण नागपूरपासून 220 km अंतरावर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला मंदिर, किल्ले, तलाव, पर्वत यांसारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. अप्रतिम सौंदर्यामुळे अनेक लोक याठिकाणी भेट देत असतात.
तोरणमाळ
मुंबई पासून हे ठिकाणचे असे की 50 किलोमीटर अंतरावर आहे. सातपुडा टेकड्यांमध्ये वसलेले तोरणमाळ हे सुट्टीसाठी अत्यंत उत्तम ठिकाण मानले जाते. या ठिकाणी गोरखनाथ मंदिर देखील प्रसिद्ध आहे. अनेक हिंदू तीर्थक्षेत्र देखील येथे आहे. या ठिकाणी यशवंत तलाव, सनसेट पॉईंट, लोटस लेक, कॉफी गार्डन आणि फॉरेस्ट पार्क इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.