Travel : हल्ली साहसी खेळांकडे अनेकांचा कल वाढलेला दिसून येतो आहे. साहसी खेळांपैकी एक असलेला खेळ म्हणजे ‘रिव्हर राफ्टिंग’… खळाळणाऱ्या , उसळणाऱ्या नदीच्या प्रवाहावर स्वार होण्याचा हा रोमांच … या खेळाचा अनुभव घेण्यासाठी भारतात ऋषिकेश हे ठिकाण तसे प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे? आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या खेळाचा थरार तुम्ही अनुभवू शकता. कुठे ? (Travel) कसे ? चला जाणून घेऊया…
ठिकाण (Travel)
कोलाड हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (मुंबई-गोवा) वर मुंबईपासून 117 किमी अंतरावर आहे, कोलाड राज्य महामार्गाने पुण्याला देखील जोडलेले आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणे आणि मुंबई दोघांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला येण्यास काही हरकत नाही.
कोलाडमधील कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. दररोज सकाळी स्थानिक धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते, ज्यामुळे राफ्टिंगसाठी चांगली संधी इथे निर्माण होते. पुणे मुंबईहून लोक (Travel) इथे आवर्जून भेट देत असतात.
कधी भेट द्याल ? (Travel)
कोलाडमध्ये वर्षभर आल्हाददायक हवामान असते, तर पावसाळा हा इथल्या रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी उत्तम काळ आहे. याचे कारण म्हणजे नदी प्रवाहित होतात आणि पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त असते. शिवाय, सभोवतालच्या हिरवाईचे सौंदर्य आणि धबधब्यांचे सौंदर्य एक अनोखा अनुभव देते.
किती येतो खर्च (Travel)
खरेतर राफ्टिंग आणि राहण्यासाठीचा खर्च तुम्ही घेत असलेल्या सोयींनवर अवलंबुन आहे. येथे पॅकेज 800 – 2000 पासून सुरू होते. निवडलेल्या मार्गासाठी, हंगामासाठी, लोकांची संख्या, राफ्टिंगसह इतर पर्यटनाचे प्रकार , इत्यादीसाठी खर्च देखील बदलतो. अनेक राफ्टिंग ऑपरेटर आहेत जे रिव्हर क्रॉसिंग, कयाकिंग आणि झिपलाइन आणि लंचसह इतर साहसी क्रियाकलापांसह रिव्हर (Travel) राफ्टिंग सेवा देतात. (व्हेज आणि नॉन व्हेज). कोलाड रिव्हर राफ्टिंगची किंमत 3000 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.