Travel : कोकण म्हंटलं की आपल्याला सुंदर निळ्याशार समुद्राची आठवण येते. सुंदर स्वच्छ पाणी समुद्र किनारे , नारळ ,आंबा फणसाच्या बागा असं सगळं बरंचसं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र तुम्हाला माहिती आहे का सुमद्राशिवाय कोकणात एक असं ठिकाण दडलंय ज्याला मिनी महाबळेश्वर (Travel) म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. आजूबाजूला सुंदर डोंगर दऱ्या , थंडगार हवा , ढगांचं जमिनीवर येणं , दाट धुक्यात हरवलेल्या वाटा … असं मनोहारी दृश्य इथे तुम्हला अनुभवायला मिळते.
कोकणातलं थंड हवेच ठिकाण(Travel)
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण आहे ‘माचाळ’. रत्नागिरी जिल्ह्यातलया लांजा तालुक्यात हे छोटसं माचाळ नावाचं गाव येतं. हे गाव समुद्रसपाटीपासून जवळपास चार हजार फुटांवर वसलं आहे. जेमतेम 300-400 लोकवस्ती असलेलं हे माचाळ. मात्र या माचाळ गावाला निसर्गाने भरभरून दिलंय असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाला थंड (Travel) हवेचे ठिकाण अर्थात पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
पुण्या मुंबईच्या पर्यटकांना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक मोकळा श्वास हवा असेल, एक रिफ्रेश होण्यासाठी ठिकाण हवं असेल तर पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही. अल्हाददायक स्वच्छ हवा तुम्हाला ताजतवानं करून जाईल. या वातावरणातला प्रवास तुम्हाला नेहमी स्मरणात राहील असा आहे. पावसाळ्यात हे गाव अधिक सुंदर होतं आणि पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं माचाळ हे गाव घनदाट जंगलांनी समृद्ध (Travel) तर आहेच पण इथल्या जंगलाचा दुसरा एक असं वैशिष्ट्य आहे की या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच इथे आल्यानंतर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.
पावसाळ्यात या ठिकाणी ढग पूर्णपणे खाली येते त्यामुळे इथं कायम धुके असते. म्हणूनच इथल्या कौलारू घरांच्या चहू बाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी (Travel) करावी लागते.
या ठिकाणची आणखी एक खासियत म्हणजे याच भागातून विशाळगडावर एक ते दीड तासात पोहोचता येते. माचाळचे ग्रामस्थ विशाळगडावर पाणी, दूध इतर गोष्टी पुरवण्यासह आणि कामांसाठी सतत येत जा करत असतात. माचाळ गावातून मुचकुंडी नदीचा उगम होतो. खरंतर या गावात मुचकुंदी ऋषींची गुहा आहे याच ठिकाणाहून नदीचा उगम झाल्याचा सांगितलं जात आहे त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधले जाते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या सुंदर ठिकाणाला भेट (Travel) द्यायला काहीही हरकत नाही.