हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस उरलेले आहेत. अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठेतरी बाहेर फिरायला जातात. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदात आणि उत्साहात करतात. जर या वर्षी देखील तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल. तर आम्ही तुम्हाला देशातील अशा काही चांगल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्हाला अत्यंत शांत आणि आरामदायी वाटेल. तसेच निसर्ग सौंदर्य यांनी समृद्ध असलेल्या या ठिकाणांना तुम्हाला भेट देता येईल.
मलनाड कर्नाटक
कर्नाटक मधील मलनाड हे अत्यंत शांत असे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक धबधबे आणि हिरवागार निसर्ग पाहायला मिळेल. तसेच अत्यंत सुंदर असा टेकड्यांचे दृश्य देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. या ठिकाणी कुमारस्वामी हिल्स, अप्सरा धबधबा, हगडी जंगलांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी जाऊन तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल.
गंगटोक सिक्कीम
गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. गंगटोक हे एक हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत या ठिकाणी जास्त गर्दी नसते. या ठिकाणचे वातावरण अत्यंत शांत असते. तसेच पर्यटन देखील खूप छान आहे. या ठिकाणाला तिबेटची संस्कृती लाभलेली आहे. तुम्ही जर या वर्षी सिक्कीमला भेट दिली, तर नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत चांगली होईल.
झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेशमधील झिरो व्हॅली हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अत्यंत शांततेत वेळ घालवता येईल. या ठिकाणी गर्दी देखील जास्त नसते. तसेच निसर्गप्रेमींसाठी ही अत्यंत चांगली जागा आहे. या झिरो व्हॅली मध्ये तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक अनुभव देखील घेता आहे. तसेच ट्रेकिंगचा अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.
वायनाड केरळ
केरळमधील वायनाड हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. अनेक लोकांना अजूनही या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे या ठिकाणी जास्त पर्यटन दिसत नाहीत. म्हणून तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचा वेळ घालवता येईल. या ठिकाणी हिरवेगार निसर्ग, चहाचे मळे देखील आहेत. तुम्ही जर नवीन वर्षासाठी फिरायला जाण्यासाठी एखादी चांगली ठिकाण शोधत असाल, तर केरळ हे ठिकाण तुमच्यासाठी अत्यंत चांगले आहे.