Travel : महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजीनाच ! पावसाळ्यात तरी या सह्याद्रीचे रूप अतिशय मनमोहक होते. पावसाळयात अशा सह्याद्रीच्या वाटा धुंडाळायला अनेकांना आवडते. अनेक निसर्गप्रेमी पावसाळयात आवर्जून सह्याद्रीचे ट्रेक करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अद्भुत ट्रेक विषयी सांगणार आहोत जिथला अनुभव नक्कीच तुमच्यासाठी मोस्ट थ्रिलिंग एक्सपीरिअन्स (Travel) असेल यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया या निसर्गाचं देणं लाभलेल्या अनोख्या ठिकाणाबद्दल…
आशिया खंडातील खोल दऱ्यांमधील दुसरा क्रमांक (Travel)
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातलं साम्रद या गावातील सांधण व्हॅली हे आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांधण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे विचार करा जवळपास 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ चार किलोमीटर लांबीवर ही व्हॅली पसरलेली आहे त्यामुळे इथे ट्रेकिंग करताना एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर ते ट्रेकर्सच्या (Travel) जीवावर बेतू शकतं.
आता ही दरी निर्माण कशी झाली तर जमिनीला भेग पडल्यामुळे ही दरी निर्माण झाली. ही दरी म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. हे तुम्हाला पाहिल्यावर नक्की समजेल.
ही व्हॅली पार करणं एक आव्हान (Travel)
अतिशय अरुंद असे घळ कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जिमतेम (Travel) एक माणूस जाईल एवढी तीन फुटाची रुंदी आणि दोन्ही बाजूला अंगावर येणाऱ्या चारशे फूट उंच पाषाणाच्या कडा इथं आहेत त्यामुळे त्याच्या भव्यतेमुळेच ही व्हॅली पार करणे एक आव्हान बनून जातं.
पावसाळ्यात या व्हॅलीला भेट देणे शक्य नाही कारण पावसाचे पाणी याच दरीमधून वेगाने खाली कोसळते. त्यामुळे इथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळ्या संपल्यानंतर येणारा हिवाळा आहे. भर दुपारच्या प्रहरात देखील ऊन सावल्यांचा (Travel) खेळ बघण्याचा प्रवास हा उत्तम अनुभवतुम्हाला देऊन जाईल. दरीत गेल्यानंतर पाण्याचे दोन पूल लागतात. पहिला पूल दोन ते चार फूट आणि दुसरा पूल हा चार ते सहा फूट पाण्यात असतो. हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते.
पावसाळ्यात ही दरी आणखी थ्रिलिंग होते खरंतर पावसाळ्याचे चार महिने सोडले की इतर वेळेमध्ये इथं पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात सांधण व्हॅलीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तेथेच मुक्काम करायचा हा इथल्या आलेल्या अनेकांचा (Travel) प्लॅन असतो. ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा पर्वत ,रतनगड आणि मागे अलंग-मदन-कुलंगगड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण व्हॅली सर करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही.
इथे कसे पोहचाल ? (Travel)
आता इथं पोहोचायचं कसं ? तर सांधण व्हॅलीला पोहोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा (Travel) धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावं लागले. पुण्यावरून पोहोचण्यासाठी आळेफाटा संगमनेर- अकोले- राजुर- शेंडी- उडदावणे- साम्रद असा रस्ता आहे. तर मुंबईहून इथे पोहोचण्यासाठी कल्याण -कासरा घाट- इगतपुरी- खोटी मार्गे शेंडीला पोहोचता येतं तर नाशिक होऊनही घोटी मार्गे इथे पोहोचता येईल.