Post Office Scheme | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली खास योजना; वर्षाला मिळणार 7.5 टक्के व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Scheme | आपल्या भविष्याचा आणि महागाईचा विचार करता आपण भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. कारण येत्या काळात महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सध्या गुंतवणूक करण्यासाठी आता बाजारात अनेक योजना देखील उपलब्ध आहेत. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या देखील गुंतवणुकीच्या काही योजना आहे. कारण यामध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) अनेक अल्प बचत योजना आहेत. त्यामुळे अनेक लोक हे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेले कित्येक वर्षापासून लाखो लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. आणि त्यांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. पोस्ट ऑफिस एक सरकारी बचत योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खास करून महिला आणि मुलींसाठी वेगवेगळ्या योजना असतात

पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. ती खूप लोकप्रिय आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहेत. 2023- 24 या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणतीही महिला किंवा मुली गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळू शकता. यामध्ये तुम्हाला वर्षाला 1 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत व्याज मिळते. तसेच दोन लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये पैसे जमा करून शकता. या योजनेचा कालावधी 2 वर्ष एवढा आहे.

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% एवढे व्याज मिळते. ही योजना सरकारने दोन वर्षासाठी चालू केलेली आहे. म्हणजेच मार्च 2025 पर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तुम्ही भारत सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून पोस्ट जर खाते उघडले, तर त्यावर तुम्हाला निश्चित 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. महिलांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेत खाते उघडण्यासाठी पात्रता | Post Office Scheme

  • या योजनेसाठी अर्ज करणारी महिला किंवा मुलगी ही भारताची नागरिक असावी.
  • त्या महिलेच्या वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा कमी असावे.
  • किशोरवयीन मुली ते ज्येष्ठ नागरिक या गटातील महिला अर्ज करू शकतात.

कोणती कागदपत्रा आवश्यक

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळख कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, जातीचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र असणे गरजेचे आहे.