हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Travel Tips) सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय. पाऊस आला की, सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं. हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते. त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक फिरायला जायचे प्लॅनिंग करतात.
साहजिक आहे, अशा वातावरणात फिरायला जावं कूणाला वाटणार नाही? जर तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्याची आवड असेल तर नक्कीच तुम्हीही फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल. (Travel Tips) म्हणूनच आज आम्ही ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पावसाळ्यात फिरायला जा पण चुकूनही खाली दिलेल्या ठिकाणी जाऊ नका आणि तरीही गेलात तर सुट्टीची वाट लागली म्हणून समजाच. जाणून घ्या.
1. गोवा (Travel Tips)
पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे गोवा. इथले बीच कायम पर्यटकांच्या गर्दीने भरलेले दिसतात. असे असले तरीही पावसाळ्यात गोव्याला जाणे मूर्खपणा मानला जातो. कारण, या काळात समुद्रकिनाऱ्याची पातळी खूप वाढलेली असते. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा बंद असतात. शिवाय हॉटेलमधून बाहेर पडणे मुश्किल होईल असा पाऊस असतो. त्यामुळे पावसाळ्यात कुठेही जा पण गोव्याला जाऊ नका.
2. लडाख
लडाख हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या या ठिकाणी बरेच रायडर्स लॉन्ग ड्राइव्ह करून येतात. अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. (Travel Tips) पण, पावसाळ्यात लडाखला जाण्याची कुणी हिंमतही करत नाही. कारण, पावसामुळे लेह- मनाली महामार्ग आणि लेह- श्रीनगर महामार्ग यांसारख्य रस्त्यांवर भूस्खलनाचा धोका असतो. त्यामुळे हे रस्ते बंद केले जातात. शिवाय पर्यटन देखील बंद असते. त्यामुळे लडाखला जाण्यात काहीही पॉईंट नाही.
3. हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात शिमला, मनाली आणि धर्मशालासारखी अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. मात्र, पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळतात. (Travel Tips) ज्यामुळे रस्ते बंद केले जातात. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये पर्यटनासाठी जाणे धोकादायक मानले जाते.
4. उत्तराखंड
भारतात उत्तराखंड हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. न केवळ देशातून तर परदेशातून सुद्धा अनेक पर्यटक इथे येत असतात. या ठिकाणी मसुरी, नैनिताल आणि हृषिकेशसारखी काही खास हिल स्टेशन्स आहेत. जी अत्यंत नयनरम्य आहेत. (Travel Tips) मात्र, या ठिकाणी पावसाळ्यात जायचा विचारही करू नका. कारण दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत इथरे पर्यटनासाठी जाणे धोकादायक ठरू शकते.
5. अंदमान आणि निकोबार
अंदमान आणि निकोबार ही अत्यंत सुंदर बेटे आहेत. हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते. असे असले तरीही पावसाळ्यात या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहतात. (Travel Tips) ज्यामुळे वाहतूक आणि जलवाहतुकीत मोठी अडचण होते. त्यामुळे या ठिकाणी भेट देणे जवळपास अशक्य होते.