जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खास वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर नेपाळपेक्षा सुंदर आणि बजेटमध्ये परवडणारी जागा दुसरी नाही. नेपाळच्या मोहक वातावरणात तुमचा दुसरा हनीमून साजरा करण्याची संधी आयआरसीटीसी तुम्हाला देत आहे. भारतातील प्रवाशांसाठी ‘मिस्टिकल नेपाळ पॅकेज एक्स मुंबई’ ही उत्तम संधी असून, कमी खर्चात नेपाळ फिरण्याची सुवर्णसंधी आहे.
पॅकेजचा कालावधी आणि तारखा
या पॅकेजमध्ये दोन बॅचेस असतील:
पहिली ट्रिप: 14 एप्रिल ते 19 एप्रिल 2024
दुसरी ट्रिप: 7 मे ते 12 मे 2024
तुमच्या सहलीतील खास सोयी-सुविधा
फ्लाइट: इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई-काठमांडू- मुंबई परतीच्या तिकिटासह प्रवास
राहण्याची व्यवस्था: 3 रात्री काठमांडू आणि 2 रात्री पोखराचा भव्य अनुभव
अन्न व्यवस्था: 5 वेळचा नाश्ता आणि 5 वेळा रात्रीचे जेवण (शाकाहारी, मांसाहारी आणि जैन पर्याय उपलब्ध)
पर्यटन स्थळे: काठमांडू, पोखरा आणि परिसरातील प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळे
गाईड सुविधा: सहलीदरम्यान टूर गाईडसह मार्गदर्शन
विमा सुरक्षा: 70 वर्षांपर्यंतच्या प्रवाशांसाठी विमा सुरक्षा
भेट देण्याजोगी ठिकाणे
काठमांडू: पशुपतीनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप, दरबार स्क्वेअर, स्वयंभूनाथ स्तूप
पोखरा: मनोकामना मंदिर, तिबेटी शरणार्थी केंद्र, सुरंगकोट, बिंध्यवासिनी मंदिर, डेव्हिल्स फॉल्स, गुप्तेश्वर महादेव गुहा
ट्रिप खर्च किती असेल?
ट्रिपल शेअरिंग: ₹46,600 प्रति व्यक्ती
डबल शेअरिंग: ₹46,900 प्रति व्यक्ती
सिंगल ऑक्युपन्सी:₹54,930 प्रति व्यक्ती
ही सफर बुक कशी कराल?
तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या IRCTC कार्यालयात जाऊन हे पॅकेज बुक करू शकता. तुमच्या बजेटमध्ये रोमँटिक आणि संस्मरणीय सहलीसाठी नेपाळची सफर नक्की बुक करा