भारतीय प्रवाशांसाठी खास ऑफर!! फक्त 11 रुपयांमध्ये करता येणार व्हिएतनामला प्रवास; कसा? जाणून घ्या

0
7
Vietnam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या विमान प्रवासाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विमान तिकिटांचे दरही वाढवण्यात आले आहेत. मात्र, अनेक विमान कंपन्या वेळोवेळी आकर्षक ऑफर देतात, ज्याचा फायदा घेतल्यास तुम्ही स्वस्त दरात आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) करू शकता. अशीच एक संधी व्हिएतजेट एअरने (Vietjet Air) भारतीयांना दिली आहे. या ऑफरनुसार, भारतीय प्रवाशांना फक्त 11 रुपये भाड्यात व्हिएतनामला प्रवास करता येणार आहे. मात्र, यामध्ये कर आणि विमानतळ शुल्क वेगळे लागू होतील.

कोणत्या मार्गांवर लागू आहे ऑफर?

मिळालेल्या माहितीनुसार, ही ऑफर भारतातील प्रमुख शहरांमधून व्हिएतनामच्या मोठ्या शहरांपर्यंत लागू आहे. भारतीय प्रवाशांना नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोची, हैदराबाद आणि बेंगळुरू येथून व्हिएतनाममधील हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दा नांग याठिकाणी प्रवास करता येईल.

बुकिंग आणि प्रवास कालावधी

या विशेष सवलतीच्या तिकिटांसाठी बुकिंग 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत करता येईल. प्रवास कालावधी 10 मार्च ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान असणार आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांना नियोजन करण्यासाठी आणि बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

व्हिएतजेट एअरची भारतातील विस्तार योजना

व्हिएतजेट एअर भारत आणि व्हिएतनाम दरम्यानच्या हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे. मार्च 2025 मध्ये ही एअरलाइन बेंगळुरू आणि हैदराबाद ते हो ची मिन्ह सिटी जोडणाऱ्या दोन नवीन उड्डाणांची सुरुवात करणार आहे. यासोबत, भारत-व्हिएतनाम दरम्यान एकूण 10 मार्गांवर 78 आठवड्याला उड्डाणे असतील.

बुकिंग कसे करावे?

या तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी प्रवाशांनी व्हिएतजेटच्या अधिकृत वेबसाइटवर (www.vietjetair.com) किंवा व्हिएतजेट एअरच्या मोबाइल ॲपवर जाऊन बुकिंग करता येईल. भारतीय प्रवाशांसाठी ही एक उत्तम संधी आहे, ज्यामुळे त्यांना कमी खर्चात सुंदर व्हिएतनामचा अनुभव घेता येणार आहे.