सलग सुट्ट्या विकेंडला जोडून आल्यामुळे तुम्ही जर मुंबई -गोवा मार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. खरंतर अलिबाग-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सकाळी 12 ते दुपारी 3 या वेळेत खारपाडा ते काशेदी दरम्यान अवजड आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.
12 एप्रिल रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर गर्दी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सकाळी 12 ते दुपारी 3 या वेळेत खारपाडा ते काशेदी दरम्यान अवजड आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.
शिवभक्तांची गर्दी, वाहतुकीसाठी विशेष खबरदारी
रायगड किल्ल्यावर हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही बंदी लागू करण्यात आली आहे.
जीवनावश्यक सेवा सुरूच
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दुध, औषधे, गॅस, ऑक्सिजन, भाजीपाला तसेच रुग्णवाहिका, पोलिस व फायर ब्रिगेडसारख्या जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना मात्र या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
वाहनचालकांसाठी प्रशासनाचा सल्ला
प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.