Travel : सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा , आजूबाजूला असणारी हिरवळ, पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे अशा निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला येत असतात. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रचलित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देण्यासाठी येत (Travel) असतात. मात्र पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता आता साताऱ्यातच नवे महाबळेश्वर साकार करण्यात येणार आहे.
एका ठिकाणी होणारी गर्दी दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी नवे महाबळेश्वर साकारण्यात येणार आहे. यासाठी कोयना बॅक वॉटर च्या भागातील 37 हजार हेक्टर क्षेत्र पाहण्यात (Travel) आले आहे.
सातारा जिल्ह्यातल्या पाटण, जावळी आणि सातारा या तीन तालुक्यांमध्ये 52 गावांमध्ये हे नवीन महाबळेश्वर निर्माण करण्यासाठी प्रस्तावित आहे. पाटण तालुक्यातल्या कराड चिपळूण रस्त्यापासून जावळी खोऱ्यातील कसबे, बामनोली आणि सावरी गावपर्यंतच्या क्षेत्रामध्ये ते विस्तारलेले (Travel) असेल.
नवीन महाबळेश्वर जिथे साकारण्यात येणार आहे तिथला हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहे. या भागातून सुळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि हिरवागार आहे त्याच सोबत घनदाट जंगलं वन्यजीव धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगीदेखील या भागाला लाभलेली आहे. त्यामुळेच हा परिसर नवीन महाबळेश्वर (Travel) साकारण्यासाठी निवडण्यात आला आहे
नवीन महाबळेश्वर साकारण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MMRDC) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून 2019 मध्ये नियुक्ती केली. मध्यंतरी करोनामुळे या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. मात्र आता त्याला पुन्हा एकदा गती मिळण्याची चिन्ह आहेत. हा प्रकल्प साकारण्यात येण्यासाठी पुढील तीन वर्षाचा कालावधी लागेल अशी माहिती (Travel) एमएसआरडीसी च्या एका व्यवस्थापकाने दिली आहे.
महाबळेश्वर हा परिसर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक सुद्धा तितकाच आहे. नवा महाबळेश्वर साकारण्यात आल्यामुळे 52 गावातील पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक ठिकाणी शोधून त्यांचा विकास केला जाणारा असून त्या ठिकाणी पर्यटक आणि इतिहास प्रेमी कशा पद्धतीने आकर्षित होतील याची काळजी घेतली जाणार आहे. या भागात रस्त्यांचे जाळे सुधारले जाणार असून कृषी पर्यटन रिसॉर्ट देखील विकसित केले जाणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणची जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे अशा संवेदनशील ठिकाणी जागांचे संरक्षण देखील करण्यात (Travel) येणार आहे.
कोणत्या गावांचा समावेश (Travel)
नवीन महाबळेश्वर मध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी (Travel) गावांचा समावेश असेल.