कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपरिषदचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी शहरातील तेली गल्ली, पोळ गल्ली, ललुबाई चाळ, गणपती मंदिर परिसरात वृक्षारोपण व ड्रेनेज लाईन, लाईट, रस्ते आदी कामांची पाहणी केली. यावेळी लोकांच्या समस्या जाणून घेत असताना नगरपरिषदेचे कर्मचारीही उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका स्मिता हुलवान, हणमंत पवार, विजय वाटेगांवकर, बाळासाहेब यादव, प्रितम यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, राहुल खराडे, नगर अभियंता ए. आर. पवार, विजयसिंह यादव, भास्कर देसाई, रामभाऊ रैनाक, बापू देसाई, अरुण बेडके, संदीप मुंढेकर, गौतम करपे, चंद्रकांत बेडके, श्रेयस शहा, उमेश मुंढेकर, प्रदीप माने, अनिल जाधव, सुनील माळी, बच्चू रावळ, बाळासाहेब बेडके, नजमु भाई, दत्ता पोळ, पांडुरंग शिंदे, सुभाष बेडके, सुनील माळी, दिपक शहा, सौरभ शहा, सतिश माळी, गणेश बेडके, फारूक पटवेकर, सलीम मुल्ला, विशाल पवार, विनोद पवार, अक्षय पवार, अभिजित पवार, राहुल पोळ, तुषार पोळ, गणेश पोळ, महेश कोरडे आदी मान्यवर व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
गटनेते राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पावसाळा सुरू झाला असून शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत. लोकांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबध्द आहोत. शहरातील सर्वच ठिकाणी ड्रेनेज, लाईट व्यवस्था आहे की नाही यांची माहीती नागरिकांच्याकडून घेत आहोत. शहरातील रस्ते काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेले आहेत. आमचे कर्तव्य आहे, की नागरिकांचे हित जोपासणे या हेतूनेच आम्ही आज शहरातील विविध भागात भेटी देत आहोत. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपणही करत आहोत.