Trekking Video : माझ्या राजा रंsss!! 86 वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर; Video पाहून भरेल उर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trekking Video) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले आजही शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी एक किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर. या किल्ल्यावर अनेक गडप्रेमी आणि शिवभक्त कायम येत असतात. अशाच एका ८६ वर्षीय आजोबांनी हा किल्ला एका दमात सर केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमचाही उर अभिमानाने भरून येईल.

८६ वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर (Trekking Video)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित असलेला किल्ले रायरेश्वर सर करणे काही सोप्पी गोष्ट नाही. पुणे जिल्ह्यात भोरवरून २७ किलोमीटर अंतरावरील हा किल्ला ट्रेकर्सच्या यादीतील टॉप किल्ल्यांपैकी एक आहे. जो सर करतेवेळी भल्याभल्यांना घाम फुटतो, अशा किल्ल्यावर कायम शिवभक्तांची गर्दी असते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका ८६ वर्षांच्या आजोबांनी हा केला सर केल्याचे दिसत आहे. ते म्हणतात ना, वय आणि धाडस यांचा काहीही संबंध नसतो. आलं मनात केलं जोमात.. असं काहीस या आजोबांचं गणित.

धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी असा आजोबांचा पेहराव आणि किल्ला चढताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह पाहून तरुणांनाही लाज वाटेल. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुण या आजोबांशी संवाद साधतोय. त्याने आजोबाना विचारले, ‘तुमचे वय किती आजोबा?’ (Trekking Video) त्यावर आजोबा म्हणाले, ‘८६’. यावर तरुणाने म्हटले, ‘८६ वय आहे तरीपण..’. तर आजोबा म्हणाले, ‘तरीपण चढायचं’. पुन्हा तरुण म्हणाला, ‘आम्ही ८६ वयापर्यंत चढणार का?’ यावर बोलताना आजोबा म्हणाले, ‘मेहनत केली का बालपण मग कुठून चढणार. मी १०० -१०० बैठक काढायचो’. यावरून आजोबांच्या ऊर्जेचा आणि उत्साहाचा पुरा अंदाज येतोय. आजोबांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या जिद्द अन आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.

महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी…

हा व्हायरल व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल sahya.veda नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कुठून येते एवढी स्फुर्ती, अन् कुठून येते येवढे धाडस, वयाची ८० पालटली तरी येवढा उत्साह, अन् आवाजात तेवढीच दणकेबाजी, फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यामुळेच..’. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. (Trekking Video) यांपैकी एकाने लिहलं आहे की, ‘आपण चढू ना.. पण तोवर जगलो पाहिजे इतकंच. ही जुनी हाडे आहेत. आपली पिढी ५८ व्या वर्षी जरी वर चढली तरी फार झाले’. तसेच आणखी एक युजरने लिहिलंय, ‘भावा.. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी एक नवी स्फूर्ती, चेतना आणि उत्साह येतो’.