हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trending Video) सोशल मीडिया म्हटलं की प्रसिद्धीसाठी व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आजकाल फोन हातात घेतला की, वेगवेगळे ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओ पहिले स्क्रोल होताना दिसतात. यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे असतात असं नाही. तर अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पनांचे सादरीकरण करतात याशिवाय काही व्हिडिओ अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे देखील असतात.
दरम्यान, सोशल मीडियावर एक क्रिएटिव्ह व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका तरुणाने ५ सीटर लांबलचक सायकल बनवल्याचे आपण पाहू शकतो. या सायकलचा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच गोलमाल सिनेमाच्या ५ सीटर बाईकची आठवण येऊ शकते.
५ सीटर सायकल
आजपर्यंत तुम्ही डबल सीटची सायकल बघितली असेल. तीन चाकी सायकलसुद्धा पाहिली असेल. पण ५ सीटर सायकल तुम्ही पाहिली आहे का? नाही ना? (Trending Video) पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा ५ सीटर सायकल पाहिली आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका तरुणाने लांबलचक आणि ५ सीटर सायकल बनवली आहे. डबल सीटचा जमाना गेला आता ५ सीटर सायकलची स्वारी एकदम भारी चालणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.
व्हायरल व्हिडीओ (Trending Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लोखंडी रोडच्या मदतीने या तरुणाने आपली ५ सीटर सायकल बनवली आहे. यामध्ये तीन मोठ्या सीट्स, एक लहान सीट आणि एक सीट खुर्चीच्या मदतीने बनवण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यावर वयोवृद्ध लोक अगदी आरामात बसू शकतात. (Trending Video) तरुणाचा हा जुगाड गावागावांमध्ये सायकल रिक्षा म्हणून नक्कीच कामाला येऊ शकतो. त्यामुळे खरोखरच हा जुगाड कामाचा आहे असे म्हटले तर चुकीचे वाटणार नाही.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर bapu_zamidar_short नावाच्या एका अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. दरम्यान अनेक नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या तरुणाच्या युक्तीचे कौतुक केले आहे. (Trending Video) तर काहींनी हा यामध्ये बऱ्याच चुका काढल्या आहेत आणि काही सूचना देखील दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘ही सायकल सुरक्षेच्या दृष्टीने सोयीची नाही’, असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने, ‘एक माणूस इतक्या लोकांचा भार घेऊन सायकल कशी चालवू शकेल?’ असा प्रश्न विचारला आहे.