आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या वारंवार साफ ठेवाव्या लागतातच. यापैकी एक गोष्ट म्हणजे बाथरूम मधल्या वस्तू. बाथरूम मध्ये वापरण्यात येणारे बादली, मग , आणि इतर साहित्य वारंवार पाण्यात राहून त्यावर डाग पडतात . काही डाग तर किती घासले तरीही निघत नाहीत. विशेषतः प्लास्टिक वस्तुंना जास्त डाग पडतात आणि बराच काळ ते तसेच राहतात. म्हणूनच आजच्या लेखात प्लास्टिक बादली ,मग अशा वस्तू कशा साफ करायच्या जाणून घेऊया…
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
प्लास्टिकचे बकेट आणि मग वरील चिकट पिवळे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समप्रमाणात मिक्स करून घ्या. पेस्ट तयार करा नंतर ही पेस्ट बकेट आणि मगावरून डागांवर लावून काही वेळ ठेवा त्यानंतर ते स्वच्छ करा.
लिंबू
लिंबू हा किचन मधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लिंबामध्ये ॲसिड असतं त्यामुळे पाण्याचे डाग सहजपणे दूर होतात. अशातच बाथरूम मध्ये बकेट किंवा प्लास्टिकच्या वस्तू ह्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यामध्ये लिंबाचा रस या वस्तूंवर तीस मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर पाण्याने आणि ब्रशने हे दाग दूर करा.
ब्लिच
ब्लिच पाण्यात भिजवून या वस्तूंवर काही वेळासाठी ठेवून द्या त्यानंतर पाण्यांना या वस्तू धुवून घ्या. बाथरूम मधील या वस्तू चकाचक निघतील.
हायड्रोजन पेरॉक्साइड
हायड्रोजन परॉक्साईड हे सुद्धा एक प्रकारचे केमिकल असून डाग आणि चिकटपणा दूर होण्यासाठी यामुळे मदत मिळेल. एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन परॉक्साईड आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते मिक्स करा हे मिश्रण डाग असलेल्या वस्तूंवर स्प्रे करा दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुऊन घ्या.
भांडी घासण्याची पावडर
भांडी घासण्याची पावडर ही प्लास्टिक वरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल. एका भांड्यात भांडी घासण्याचे पावडर घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा. ही पेस्ट डाग असलेल्या जागांवर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटं ते तसंच राहू द्या नंतर एका ब्रशच्या मदतीने डाग घासून घ्या