Tuesday, October 4, 2022

Buy now

भाजपाची तिरंगा बाईक रॅली : कराडात आ. जयकुमार गोरे, अतुल भोसलेंची उपस्थिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराड शहरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ हुतात्मा स्मारकात हुतात्मा स्तंभास अभिवादन करुन करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, डाॅ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली.

शहरातील हुतात्मा स्मारक, कोल्हापूर नाका- दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, भेदा चौक ते कार्वे नाका पर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, यांच्यासह भाजयूमोचे सुदर्शन पाटसकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, प्रशांत कुलकर्णी, पै धनाजी पाटील, प्रमोद शिंदे, प्रमोद पाटील, सागर शिवदास, तानाजी देशमुख, रामकृष्ण वेताळ, सारिका गावडे, सीमा घार्गे, स्वाती पिसाळ, धनाजी पाटील, सचिन पवार, आबा गावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, हर घर तिरंगा अभियान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज जे लोक देशाच्या सीमेवर संरक्षण करत आहेत, त्याचा सन्मान व्हावा, बहुमान व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने हे अभियान राबिवले जात आहे. सातारा जिल्ह्यात सर्वच 11 तालुक्यात मी स्वतः उपस्थित राहणार असून हे अभियान यशस्वी केले जाईल.

डाॅ. अतुल भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाचे बलिदान दिले, अशा लोकांचा बहुमान व्हावा यासाठी ही मोहिम हाती घेतली. या अभियानात कराड येथे मोठा प्रतिसाद मिळाला, असून अभियान यशस्वी झाले.

Related Articles