Maha Shivaratri 2025| हिंदू धर्मात महाशिवरात्री हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदाची महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून यादिवशी विशेष त्रिग्रही योग तयार होणार आहे. हे त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानले जातात. तसेच या दिवशी शिवशंकराची म्हणून मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
महाशिवरात्रीचे महत्त्व आणि पूजा विधी
महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराला समर्पित असतो. या दिवशी लाखो भाविक उपवास धरतात आणि भगवान शिव शंकराची पूजा करतात. यादिवशी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला होता, म्हणूनच हा दिवस विशेष पवित्र मानला जातो.
यंदाची महाशिवरात्री विशेष का?
यंदा महाशिवरात्रीला तब्बल 60 वर्षांनंतर एक दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण होत आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि शनी एकाच राशीत एकत्र येणार आहेत, यामुळे हा दिवस अधिक प्रभावी ठरणार आहे. तसेच, शिवयोग आणि सिद्धयोग या शुभ योगांचा संयोग देखील यंदा घडणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पूजेचे फल अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.
राशीनुसार महाशिवरात्रीचा प्रभाव (Maha Shivaratri 2025)
मेष रास
मेष राशीच्या जातकांसाठी हा दिवस आनंदाची बातमी येईल. यादिवशी नोकरी-व्यवसायात प्रगतीची नवी दारं उघडतील. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. तसेच, महादेवाच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी महाशिवरात्री अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.(Maha Shivaratri 2025) व्यवसायातील निर्णय फायदेशीर ठरतील. तसेच, यादिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा लाभ देईल.
सिंह रास
सिंह राशीच्या जातकांना महाशिवरात्री नवीन संपत्ती, वाहन किंवा महत्त्वाच्या खरेदीसाठी उत्तम संधी प्रदान करेल. आर्थिक वृद्धी होईल, तसेच, नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. पारिवारिक जीवनात शांतता आणि समाधान लाभेल.




