अहमदनगरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, ग्रामस्थांकडून करण्यात आला रास्ता रोको

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये ट्रक आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. ट्रकची धडक बसल्यानंतर दुचाकी ट्रकखाली जावून काही अंतरावर ओढत गेली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील साळवे असे या अपघातात (accident) जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नगर-दौंड महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातानंतर (accident) ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात संतप्त झाले. यानंतर त्यांनी बाबुर्डी बेंड परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने हे अपघात (accident) होत असल्याचा आरोप केला. गेल्या वर्षभरापासून गॅसची पाईपलाईन रोडच्याकडेला पडून आहे. ही पाईपलाईन उद्यापर्यंत न हलवल्यास अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आला.

या रस्ता रोको आंदोलनामुळे नगर-दौंड महामार्गावर (accident) अर्धा तास ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!