हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला जर कोणत्या अनोळखी नंबर वरून कॉल किंवा मेसेज आला तर आपण Truecaller अँप डाउनलोड करून त्याद्वारे सदर नंबर कोणाचा आहे याची माहित घेतो. परंतु आता Truecaller ने आपलं वेब व्हर्जन लाँच (Truecaller Web Version) केलं आहे. त्यामुळे मोबाईल मध्ये अँप डाउनलोड न करताही तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून मोबाईल नंबर सर्च करू शकता. कंपनीने सध्या तरी हे वेब व्हर्जन Android यूजर्ससाठी लाँच केलं असलं तरी येत्या काही दिवसात ते IOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
Truecaller वेब व्हर्जन लाँच (Truecaller Web Version) झाल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व मजकूर संदेश आणि चॅट्स थेट तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून वाचू शकता आणि त्यावर रिप्लाय सुद्धा देऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे मोबाईल जवळ नसतानाही यूजर्स हे अलर्ट पाहू शकतात. हे सर्व संदेश इनबॉक्स, प्रमोशन आणि स्पॅम अशा तीन श्रेणींमध्ये आयोजित केले जातील. Truecaller वेबवरील तुमच्या सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेते. कंपनीने फोन आणि वेब ब्राउझरमध्ये एन्क्रिप्टेड लिंक तयार केली आहे. त्याची सेटअप प्रक्रिया देखील खूप सोपी आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांचे डिव्हाइस सहजपणे लिंक करू शकतात.
कसा करायचा वापर – Truecaller Web Version
यासाठी सर्वात आधी तुम्हाला Android मोबाईल मध्ये Truecaller ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मेसेज टॅबमध्ये दिलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.
यानंतर, मेसेजिंग फॉर वेब वर टॅप करा आणि डिव्हाइस लिंकवर क्लीक करा. Truecaller Web Version
येथे यूजर्सना QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळेल.
आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर च्या वेब ब्राउझरमध्ये truecaller वेबच्या वेबसाइटवर जावे लागेल.
येथे मोबाईल मधील QR कोड स्कॅन करा. यानंतर, Truecaller च्या सर्व सेवा तुमच्या कम्प्युटरवर ॲक्सेस करता येतील.
आता तुम्हाला अज्ञात क्रमांक, एसएमएस आणि चॅटिंगची सुविधा मिळेल.