हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tulsi Face Packs तुळशी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यापासून आपल्याला अनेक फायदे मिळतात. तुळशीची पाने ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी देखील तुळशीच्या पानांचा खूप उपयोग होतो. आपण तुळशीच्या पानांचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावू शकतो. या फेसपॅकचे अनेक फायदे असतात. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तुमच्या त्वचेसाठी तुळशीची पाने हा एक चांगला नैसर्गिक उपाय आहे.
तुळशीमध्ये (Tulsi Face Packs) अँटिबॅक्टरियल गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे एंटी फंगल आणि अँटिऑक्सिडंट सारखे गुणधर्म असतात. त्यामुळे आपली त्वचा निरोगी राहते तसेच नेहमीच चमकते. त्याचप्रमाणे तुळशीमुळे आपल्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत होते. त्वचेचा रंग देखील सुधारतो. तुळशीच्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला पोषण देखील मिळते. तुम्ही जर तुळशीच्या पानांपासून फेसपॅक तयार केला, तर तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. तसेच तुमची त्वचा देखील चांगली होते. आता या फेसपॅक बनवण्याच्या काही पद्धती आहेत. ते आपण जाणून घेणार आहोत.
तुळस पावडर, लिंबू, दही फेस पॅक
तुम्ही जर दोन चमचे तुळशीच्या पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि तो तुमच्या चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटे ते कोरडे होऊ द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. लिंबूमुळे काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला चांगला रंग देखील येतो.
तुळशीच्या पानांची पेस्ट आणि दही फेसपॅक
तुम्ही 8 ते 10 तुळशीची पाने बारीक करून त्यात एक चमचा दही मिसळा आणि नंतर ती पेस्ट चेहऱ्याला लावा. 20 मिनिटे किती पेस्ट चेहऱ्यावर सुकू द्या. वीस मिनिटांनी कोमट पाण्याने तोंड धुवा. त्यामुळे तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते.
तुळशी आणि कडुलिंबाच्या तेलाचा फेसपॅक | Tulsi Face Packs
तुम्ही दोन चमचे तुळशीच्या पावडरमध्ये दोन चमचे कडुलिंबाचे तेल घाला, आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावून रात्री भर झोपा. सकाळी कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवून टाका. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्स आणि मुरूम येण्याची समस्या कमी होते.
तुळशी आणि क्रीम फेसपॅक
तुम्ही एक चमचा मलाई एक चमचा तुळशीच्या पावडरमध्ये मिसळा आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे ते तसेच राहू द्या. ही क्रीम तुमच्या त्वचेला आतून हायड्रेट करते आणि तुमची त्वचा देखील मऊ होते.
तुळशी, जोजोबा तेला, मुलतानी माती फेसपॅक
तुम्ही एक चमचा तुळशीच्या पेस्टमध्ये एक चमचा मुलतानी माती अर्धा चमचा आणि गुलाब पाणी मिसळा आणि तुमच्या चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे ते तसेच ठेवा. सामान्य पाण्यामध्ये धुवा त्यामुळे तुमच्या त्वचेला पोषण प्राप्त होते.
तुळस आणि मध फेसपॅक
तुम्ही 15 ते 20 तुळशीच्या पानांची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटात तसेच ठेवा. नंतर मग ते देऊन टाका मग तुमच्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. तसेच तुमची त्वचा मॉइश्चराईज राहते.