“आत्महत्येपूर्वी तुनिशा डेटिंग ॲपवर ‘त्या’ व्यक्तीशी बोलत होती; शिझानच्या वकिलाचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिझान खानच्या जामिनावर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला. तुनिशा (tunisha sharma) ही एका डेटिंग ॲपवरील अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असे त्यांनी कोर्टामध्ये सांगितले आहे. आत्महत्येच्या काही दिवस आधी तुनिशा (tunisha sharma) अलीच्या कंपनीत होती, असेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्या अभिनेता शिझान सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. यानंतर तुनिशाच्या (tunisha sharma) आईने केलेल्या आरोपावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक करण्यात आली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

तुनिशाच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांनी कोर्टात सांगितले. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अलीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असा दावादेखील त्यांनी केला आहे. तसेच या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडली नसल्याचेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे आता कोर्ट पुढील सुनावणीत काय निर्णय देते याकडे तुनिशाच्या आणि शिझानच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय