Tur Crop Cultivation | तुरीच्या ‘या’ सुधारित वाणांची करा लागवड, होईल भरघोस कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tur Crop Cultivation | खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी खरीप हंगामात वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. या हंगामात खास करून सोयाबीन आणि कपाशी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षापासून कपाशी या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसला आहे. तसेच सोयाबीन पिकावर देखील किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे दोन्ही पिकांना बाजारभाव देखील कमी होत आहे. परंतु आता या खरीप हंगामात तुम्ही तूर या पिकाची लागवड केली, तर शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा मिळू शकतो. या पिकाला पैशाचे पीक म्हणून देखील ओळखले जाते.

तुम्ही जर योग्य व्यवस्थापन केले, तर तुरीपासून (Tur Crop Cultivation) कमी खर्चात तुम्हाला खूप चांगले उत्पादन मिळवता येईल. या पिकाला बाजारभाव देखील चांगला मिळतो. आज काल अनेक शेतकरी तूर या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहे. तुम्ही देखील तुरीची लागवड करणार असाल, तर तुरीच्या काही वाणांबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला योग्य निवड करता येईल आणि तुम्हाला उत्पादन देखील चांगले मिळेल.

भरघोस उत्पादन देणारे तुरीचे वाण | Tur Crop Cultivation

बीडीएन 711

तुरीचे हे वाण कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेले आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी हे वाण अत्यंत उपयुक्त आहे. लागवड केल्यानंतर 150 ते 160 दिवसानंतर हे पीक काढणीस येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी पाण्यात हे पीक वाढते.

गोदावरी बीडिएन 2013 – 41 | Tur Crop Cultivation

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी गोदावरी या तुरीच्या वाणाची लागवड केली, तर त्यांना खूप फायद्याची होईल. गोदावरी हे वाण उशिरा काढणीस तयार होते. या पिकाची परिपक्वता 170 दिवसांनी होते. तसेच या वाणापासून तुम्हाला भरघोस उत्पन्न देखील मिळते. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे आणि सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना या वाणाची लागवड करता येईल. या वाणांच्या तुरीचे दाणे हे पांढऱ्या रंगाचे असतात. त्याचप्रमाणे विदर्भ विभागासाठी बदनापूर कृषी संशोधन केंद्राने हे विकसित केलेले आहे.