Sunday, May 28, 2023

Turkey Syria Earthquake : तुर्की- सीरियातील भूकंपात आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक बळी; पहा मन हेलावणारे Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भूकंपात आतापर्यंत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Turkey Syria Earthquake

सोमवारपासून तुर्कीत 550 वेळा भूकंप आला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे.

Turkey Syria Earthquake

आकडेवारीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक बचाव कार्यात व्यस्त आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Turkey Syria Earthquake

जगभरातील अनेक देशांनी या कठीण परिस्थितीत तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात दिला आहे. भारताने सुद्धा आपली एनडीआरएफची टीम बचावासाठी पाठवली आहे. याशिवाय अमेरिका, चीनसह अनेक देशांकडून दोन्ही देशांना मदत केली जात आहे. मात्र, असे असूनही बचाव पथक कमी पडत आहे. (Turkey Syria Earthquake) परिस्थिती इतकी बिकट आहे की ढिगाऱ्याखालून बचावलेले लोक ओरडत आहेत आणि त्यांचे ऐकायला कोणीही नाही.

Turkey Syria Earthquake

तुर्की आणि सीरिया मध्ये जखमींवरील उपचारासाठी आरोग्य व्यवस्था पण कमी पडत आहेत. जगभरातील अनेक देशांनी वैद्यकीय मदत आणि जीवनावश्यक वस्तू तुर्की आणि सीरियाला पाठवल्या आहेत.

Turkey Syria Earthquake

भारताकडून मोठी मदत-  (Turkey Syria Earthquake)

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. या भागात एनडीआरएफचे 101 जवान दोन विशेष विमान सी-17 ग्लोबमास्टरने तुर्कस्तानला पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याला ऑपरेशन दोस्त असे नाव देण्यात आले आहे.