Turmeric Cultivation | आपल्या देशात गृहिणी स्वयंपाक करताना हळदीचा वापर नेहमीच करत असतात. आपल्या मसाल्यातील हळद हा अत्यंत महत्त्वाचा असा मसाला आहे. भारतात या हळदीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक राज्यांमध्ये हळद हे प्रमुख पीक घेतले जाते. परंतु ज्या शेतकऱ्यांना हळदीची लागवड करायची आहे. त्या शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. जेणेकरून त्यांना खूप चांगला नफा होईल आणि त्यांचे उत्पन्न देखील चांगले होईल.
हाती आलेल्या माहितीनुसार उष्ण आणि दमट हवामानात हळद पिकाची चांगली वाढ होते. यासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असते योग्य आहे. तसेच हळदीसाठी चांगला निसरा होणारी चिकन माती आणि वालुकमाई माती असणे गरजेचे असते. या मातीचा पीएच 6.5 ते 8.5 यांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी खतांचा वापर देखील आपण केला पाहिजे. तसेच शेणखत, निंबोळी, पेंड, युरिया यांसारख्या हातांचा देखील वापर केल्यास हळदीचे पीक चांगले येते.
हळद पीक तयार करण्यासाठी किती वेळ लागतो.
जून ते जुलै महिन्यात हळद या पिकाची लागवड केली जाते. या पेरणीसाठी निरोगी आणि रोगमुक्त कंद निवडणे खूप गरजेचे असते. त्यांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नियमितपणे शेतकऱ्यांना त्यातील तर काढावे लागते. जर या स्तनाची वाढ झाली तर पिकाला पोषक तत्वे मिळत नाहीत. हळदीचे पीक आठ ते दहा महिन्यात तयार होते आणि काढल्यानंतर ते उन्हात वाळवले जाते.
हळदीसाठी सेंद्रिय शेतीचा वापर करा | Turmeric Cultivation
तज्ञांच्या मते हळदीच्या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला. तर हळद खूप चांगली येते हळदीच्या सुधारित वाणांची लागवड करून देखील शेतकरी खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात.