Turmeric Farming | हळद लागवड करताना शेतकऱ्यांनी ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, होईल चांगली कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Turmeric Farming | आपल्या भारतामध्ये हळद एक प्रमुख मसाला आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात हळदीशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे भारतात हळदीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक राज्यांमध्ये हे हळदीचे पीक घेतले जाते. परंतु जे शेतकरी हळदीची लागवड करणार आहेत. त्यांच्यासाठी काही खास गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला भरघोस नफा मिळेल. आणि तुमचे उत्पन्न देखील भरपूर होईल. तर आज आपण हळदीच्या लागवडीबाबत काही गोष्टी जाणून घेऊयात.

हळदीच्या लागवडीसाठी वालुकामय चिकन माती किंवा चिकनमाती लागते. ज्यातून हळदीचे पीक चांगले येते. हळदीच्या पेरणीची वेळ ही त्यांच्या जातीनुसार ठरवली जाते. त्यातल्या त्यात 15 मे 23 जून ही हळद लागवड करण्याची एक चांगली वेळ आहे. हळद पेरणीसाठी ओळीपासून ओळी पर्यंत 30 ते 40 सेंटीमीटर अंतर त्याचप्रमाणे रोपापासून रोपापर्यंत 20 सेंटीमीटर अंतर ठेवावे लागते.

हळद तयार होण्यासाठी किती वेळ लागतो

हळदीचे पूर्ण पीक तयार व्हायला 8 ते 10 महिन्यांचा कालावधी जातो. साधारणपणे जानेवारी ते मार्च महिन्यात हे पीक घेतले जाते. ते पिक पूर्ण झाल्यानंतर त्याची पाने सुटतात तसे हलकी तपकिरी पिवळी होतात. हळदीची लागवड सहज आणि सावलीतही करता येते. त्याचे नियमितपणे तण काढावे लागते आणि त्याला पोषक तत्वे देखील द्यावी लागतात.

उष्ण व दमट हवामानात हळदीची चांगल्या प्रकारे वाढ होते. हळदीसाठी 20 ते 30° c तापमान योग्य आहे. यासाठी मातीचा पीएच 6.5 ते 8.5 या दरम्यान असणे गरजेचे आहे. हळदीसाठी चांगल्या खताचा वापर करणे देखील गरजेचे आहे. शेणखत, निंबोळी पेंड, युरिया यांसारखा खतांचा फायदा हळद या पिकाला योग्य असतो.

हळदीच्या चांगल्या जाती | Turmeric Farming

  • कमी वेळात तयार होणाऱ्या ‘कस्तुरी’ वर्गातील वाण – स्वयंपाकघरात उपयुक्त, 7 महिन्यांत पीक तयार, उत्पादन कमी. जसे-कस्तुरी पसुंटू.
  • मध्यम परिपक्वता कालावधी असलेले केसरी वर्गाचे वाण – 8 महिन्यांत तयार, चांगले उत्पादन, चांगल्या प्रतीचे कंद. जसे केसरी, अमृतपाणी, कोठापेटा.
  • दीर्घ कालावधीचे वाण – 9 महिन्यांत तयार, सर्वाधिक उत्पादन, गुणांमध्ये सर्वोत्तम. दुग्गीराळा, टेकूरपेठ, मिडकूर, आरमुर. डुग्गीराळा आणि टेकुपेट यांची उच्च दर्जाची असल्याने व्यावसायिक स्तरावर लागवड केली जाते.
  • याशिवाय मिठापूर, राजेंद्र सोनिया, सुगंधम, सुदर्शन, रशीम आणि मेघा हळदी-१ या हळदीच्या इतर जाती आहेत.