Turmeric Farming | हळदीचे भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी, ‘या’ वाणांची करू शकता लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Turmeric Farming | हळदी आपल्या भारतातील मसाल्यांपैकी एक सातत्याने वापरला जाणारा मसाला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे भारतात हळदीची लागवड देखील केली जाते. अनेक शेतकरी छोट्या प्रमाणात देखील हळदीची लागवड करतात. परंतु हळदीची लागवड करताना काही लक्ष गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही हळदीची लागवड केली, तर तुम्हाला भरघोस नफा मिळेल आणि तुमचे उत्पन्न देखील वाढेल.

हळदीची पेरणी (Turmeric Farming) ही एका विशिष्ट वातावरणात केली जाते. विविध जातीनुसार 15 मे ते 30 जून दरम्यान हळदीची लागवड केली जाते. ही पेरणी करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर 30 ते 40 cm असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रोपांमधील अंतर 20 सेंटिमीटर असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एकरी तुम्हाला जर लागवड करायची असेल तर 6 क्विंटल बियाण्यांची तुम्हाला आवश्यकता असते.

हळद तयार होण्यासाठी किती वेळ लागतो | Turmeric Farming

हळद लागवडीसाठी शेतात पाण्याची सोय असणे खूप गरजेचे असते. यासाठी जवळपास आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. पिकांची लागवड जर आपण मे ते जून महिन्यात केली. तर त्याचे पीक आपल्याला साधारण जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळते. हळदीचे पीक पूर्ण झाल्यानंतर हळदीची पाने सुकायला लागतात. त्याचप्रमाणे तपकिरी किंवा पिवळी देखील पडतात. या हळदीची लागवड सावलीत देखील करता येते. परंतु या हळदीची लागवड केल्यानंतर त्यातील नियमितपणे तन काढावे लागते.

हळदीसाठी पोषक वातावरण

हळदीच्या पोषणासाठी उष्ण आणि दमट वातावरण गरजेचे असते. यासाठी 20 ते 30°c तापमान योग्य असते. यासाठी मातीचा पीएच 6.5 ते 8.5 असणे गरजेचे असते. हळदीचे जर चांगले उत्पन्न पाहिजे असतील तर त्यासाठी खताचा वापर करणे देखील गरजेचे असते. तुम्हाला शेणखत, निंबोळी पेंड किंवा युरिया या खतांचा वापर करावा लागेल तर तुमची हळद चांगली वाढ होईल..

हळदीच्या कोणत्या जाती आहेत

कस्तुरी ही जात कमी काळामध्ये तयार होते 7 महिन्यांमध्ये या या हळदीचे पीक तयार होते. केशरी या जातीची हळद 8 महिन्यात तयार होते.

सेंद्रिय शेतीचा वापर करणे गरजेचे

तुम्हाला जर हळदीचे चांगले पिक पाहिजे असेल तर त्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करणे खूप गरजेचे असते. हे पीक मिश्र शेती म्हणून घेता येते. हळदीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी शेतकरी अधिक उत्पन्न देखील घेऊ शकतात.