Turmeric Varieties | हळद ही भारतीय मसाल्यातील एक मुख्य मसाला आहे. हळदीशिवाय कोणता भरतोय पदार्थ तयार होत नाही. भारतात हळदीची शेती देखील अनेक ठिकाणी केली जाते. अगदी बारमाही या हळदीचे पीक आपण घेऊ शकतो.परंतु हळदीचे पीक घेताना कोणत्या जातीची लागवड केली पाहीजे? याची अनेकांना माहित नसते. आज आपण हळदीच्या कोणत्या जातीचा (Turmeric Varieties) जास्त फायदा देतात हे पाहणार आहोत.
हळद ही एक उष्णकटिबंधीय पीक आहे. हळद समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत येते. हे पीक सामान्यतः 20 – 30 अंश सेल्सिअस तापमानात येते. 1500 मीमी पेक्षा जास्त पाऊस या पिकासाठी अत्यंत योग्य असतो. त्याचप्रमाणे निचरा आणि वाळूकामय झालेली मृदा त्याचप्रमाणे चिकनमाती या हळदीच्या पिकासाठी योग्य असते. या मातीचा PH 4.5 ते 7.5 या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. आता आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या हळदीच्या जाती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख हळदीच्या जाती | Turmeric Varieties
वायगन – ही जात वर्धा जिल्ह्यामध्ये येते. महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम हळदीच्या जातींपैकी ही एक जात मानली जाते. यामधून 1 किलोपर्यंत हळद मिळू शकते
राजापूर – राजापूर ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हळदीची जात आहे. या हळदीची गुणवत्ता देखील चांगली येते. आणि उत्पन्न देखील खूप चांगले येते. यामुळे ही खूप प्रसिद्ध जात आहे.
सुवर्णा – भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली ही जात आहे. ही जात खूप चांगले उत्पन्न देते. ही जात एक हेक्टरी 17.4 टन एवढे उत्पादन देते.
सुगंधा – या हळदीची जाती चांगल्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. त्यामुळे या जातीची पैदास देखील अनेक लोक करतात. ही जात देखील महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
वरील हळदीच्या जाती या महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. परंतु या हळदीच्या जातीची निवड करताना तुमच्या जमिनीचा प्रकार, तुमच्या येथील बाजारपेठ आणि हवामान या सगळ्याचा विचार करून तुम्ही हळदीची जात निवडणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राला देखील भेट देऊ शकता.