महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवली; गांधीजींच्या पणतूचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांबाबत एक ट्विट केले आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असा ट्विटद्वारे गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे.

तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. सावरकरांनी नथुराम गोडसेला बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. ” असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.

ट्विटनंतर तुषार गांधी यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, मी आरोप करत नाही आहे. मी जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितले आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार 26, 27 जानेवारी 1948 च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडले. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही.