कोन बनेगा करोडपती आज पासून होणार सुरू

0
33
kbc
kbc
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सुरज शेंडगे

टेलिव्हिजन जगतात सर्वोच्च टी.आर.पी कमावणाऱ्या टिव्ही शो ला आज पासून सुरुवात होणार आहे.आज पासून सुरू होणाऱ्या कोन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा हा दहावा अध्याय आहे. अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या सूत्रसंचालनातून साकार होणारा कार्यक्रम लोकांच्या अत्यंत पसंतीला उतरला आहे.आज रात्री ९ वाजता सोनी वाहिनी वर हा कार्यक्रम सर्वांच्या भेटीला येतो आहे.या अध्यायात कोन बनेगा करोडपतीचे सर्वोच्च बक्षीस ७कोटी रुपये आहे.हॉट सीट वर आलेल्या व्यक्तीला करोडपती बनण्यासाठी १६ प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार आहेत.
मागील अध्यायात समाजातील अत्यंत गरीब लोकांना कोटींची बक्षिसे मिळवून दिली होती. विशेष म्हणजे या पर्वात महिलांनी मोठी कामगिरी केली होती.या कार्यक्रमात करोडपती झालेल्या महिलांसोबत अमिताभ बच्चन यांनी स्त्री पुरुष समतेचा संदेश दिला होता.करोडपती बनण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईला येतात.अत्यंत गरीब घरातील लोक एका क्षणात करोडपती झाल्याचे बघण्याची पर्वणी आज पासून सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here