टीम, HELLO महाराष्ट्र । तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटर वर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता. अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे. युजरने मुख्यमंत्र्यांना सल्ल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान सध्या देशात तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले. गुन्हा ज्या ठिकाणी घडला तिथे तपास करण्यासाठी तसेच गुन्हा कसा केला याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आलं होतं. त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिथं झालेल्या चकमकीत चारही आरोपी ठार झाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत
आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.