दुर्दैवी ! बुलढाण्यात वीजेच्या धक्क्याने महिलेसह दोन बैलांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाने (heavy rain) मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. बुलढाणामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस (heavy rain) पडला. सिंदखेड राजा, लोणार, चिखली , मोताळा , शेगांव तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चिखली तालुक्यातील शेळगाव, अंचारवाडी, देऊळगाव घुबे भागात तर भागात तर नदी नाले पुन्हा तुडुंब वाहू लागले आहेत. तर सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसात (heavy rain) कडकडाट आंनी वीजांचा कहर झाल्याने साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचे पती गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे पती पत्नी शेतात काम करत होते. तसेच मोताळा तालुक्यात रिधोरा या ठिकाणी वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बहुतांश गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस (heavy rain) पडल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. सावरगाव तेली येथे जोरदार पाऊस (heavy rain) पडल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे गावाचा संपर्क काही तासांसाठी तुटलेला होता. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर तसेच शाळेतील विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते. सावरगाव तेली येथिल पुल हा लहान असल्याने अनेकदा हा पुल पाण्याखाली जातो. गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी नवीन पुलाची मागणी करत आहेत मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सावरगाव तेली येथिल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात
राज्यात कालपासून पुन्हा मुसळधार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात एका महिलेसह दोन बैलांना अंगावर वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर