कॉलेज कपलचा Private Video सोशल मिडीयावर झाला लीक; भितीपोटी दोघांची उचलले टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक शुल्लक कारणावरून देखील तरूण टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच कर्नाटकात येथील दावणगिरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दावणगिरी याठिकाणी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारी महाविद्यालयात शिकणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांचा एका अज्ञात व्यक्तीकडून प्रायव्हेट सोशल मीडियावर व्हिडीओ लीक करण्यात आला होता. त्यानंतर याची माहिती या दोन विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी आत्महत्या करून स्वतःला संपवले आहे. याप्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाने व्हिडिओ काढलेल्या अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी ही कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही विद्यार्थी गेल्या एक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा हे दोघेजण आपल्या महाविद्यालयाच्या टेरेसवर बसले होते तेव्हा त्यांचा एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत आक्षेपार्ह्य व्हिडिओ शूट केला. यानंतर या व्हिडिओला शुक्रवारी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. याची माहिती संबंधित व्हिडिओतील तरुणीला समजतात तिने भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले. तर या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती तरुणाला मिळतात त्याने देखील आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाने जवळील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्य तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस अज्ञात व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण देखील तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच उडुपी येथे विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये कॅमेरा लावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या घटनेमध्ये काही विद्यार्थिनींनी दुसऱ्या विद्यार्थिनींचे प्रायव्हेट व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांच्या वॉशरूममध्ये कॅमेरा लपविला होता. यानंतर या तिन्ही विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली होती. आता ही घटना ताजी असतानाच प्रायव्हेट व्हिडिओ क्लिक केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.