व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये आईचा व मुलाचा समावेश आहे. तर या अपघातातील (accident) जखमींना कर्जत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम चालू असताना मोठे दगड रस्त्यावर आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे स्थानिक लोकांनी रास्तारोको आंदोलन केले आहे.

रेल्वे मार्गाच काम चालू असताना अपघात
सध्या कर्जत रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. यावेळी झालेल्या ब्लस्टिंगमुळे मोठे दगड रस्त्यावर आल्याने हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातामध्ये (accident) आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक आक्रमक
या अपघातानंतर (accident) स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यानंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय