बीड अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दोन्ही अपघातात एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे बीड अहमदनगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, बीड अहमदनगर रस्ता प्रवासासाठी धोक्याचा बनला असल्याचे देखील म्हणले जात आहे.

रुग्णवाहिकेने दिली ट्रकला धडक

बीड अहमदनगर रस्त्यावर पहिला अपघात हा बुधवारी (दि. 25) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. तर दुसरा अपघात गुरुवारी (दि.26) सकाळी साडेसहा वाजता झाला. यातील पहिल्या अपघातात धामणगावकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकला आष्टी तालुक्यातील दौलावडगाव जवळ एका रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. ज्यामध्ये रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये, अम्बुलन्समधील चालक भरत सिताराम लोखंडे, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु तिरखुंडे आणि डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के यांचा मृत्यू झाला आहे. सध्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव सूर्यभान घुमरे यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालू आहेत.

सागर ट्रॅव्हल्स पलटी झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू

दरम्यान, बीड अहमदनगर रस्त्यावर दुसरा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता झाला. या अपघातात बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्स पलटी झाल्यामुळे यामध्ये जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सागर ट्रॅव्हल्स मुंबई कडून बीडकडे जात होती. मात्र यावेळी ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने सकाळी 6:30 वाजता ट्रॅव्हल्स पलटली झाली. या दुर्घटने तब्बल सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नाजिक येथे झाला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर आष्टी व नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.