शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक : जागीच 3 युवक ठार, 3 गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात तीनजण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज रविवारी दि. 14 आॅगस्ट रोजी दुपारी ही दुर्देवी घटना घडली असून घटनास्थळी फलटण पोलिस दाखल झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फलटणवरुन शिंगणापूर दिशेने चाललेल्या बजाज कंपनीच्या पल्सर 220 दुचाकी क्र. (एम.एच- 11 सी. पी.- 0658) वरुन ऋषिकेश किशोर चिंचकर, श्रेयश गोविंद कदम, यशराज सतिश सुळ हे तिघे निघाले होते. यावेळी समोरून जावलीच्या दिशेने होंडाशाईन दुचाकी क्रमांक (एम. एच.- 11 बी. एफ- 8490) या दुचाकी वरुन महेश शिवाजी गोफणे, पद्मसिंह विश्वास गोफणे, धनंजय भगवान गोफणे हे तिघे जात होते. वडले येथे समोरासमोर दोन्ही दुचाकीत अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले आहेत.

अपघातात जखमी व ठार झालेल्यांची नांवे पुढीलप्रमाणे ः- अपघातात ऋषिकेश किशोर चिंचकर (वय- 18, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा), श्रेयश गोविंद कदम (वय- 21, रा. कापशी, ता. फलटण, जि. सातारा), महेश शिवाजी गोफणे (वय- 33, रा. जावली, ता. फलटण) हे तिघे ठार झाले. तर यशराज सतीश सुळ (वय- 18, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. पद्मसिंह विश्वास गोफणे (रा. जावली, ता. फलटण), धनंजय भगवान गोफणे (रा. जावली, ता. फलटण) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर फलटण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या तिघांचीही परिस्थिती गंभीर स्वरूपाची असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरगडे, धोंगडे, पोलीस नाईक देशमुख, कॉन्स्टेबल शेख, गायकवाड, खरात हे तातडीने घटनास्थळी दाखल होवून पुढील कार्यवाही सुरू केली.