साताऱ्यातील ‘या’ धरणात पोहायला गेलेले 2 तरुण बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हामुळे महाविद्यालीन मुले पोहण्यासाठी व फिरण्यासाठी नदी, तलाव परिसरात जात आहेत. मात्र, अशावेळी घाबरदारी न घेतल्यामुळे अनेक अनुचित घटना घडत आहेत. अशीच घटना परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणात घडली आहे. या ठिकाणी रविवारी सायंकाळी साताऱ्यातील दोन तरुण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत संबंधित तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरण परिसरामध्ये रविवारी दोन तरुण फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही उरमोडी धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी पोहताना त्यांना अचानक दम लागला आणि ते बुडाले. त्यांनी पोहायला जाताना धरणाच्या काठावर दोन मोबाईल आणि कपडे ठेवले होते. ते कपडे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतररता नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला दिली. रेस्क्यू टीमने तातडीने धरण परिसरात धाव घेतली.

मात्र, अंधार पडल्यामुळे त्यांना मदतकार्यात अडथळे आले. दरम्यान, धरणात बुडालेल्या तरुणांचा अजूनही शोध घेतला जात आहे. संबंधित दोघेही तरुण साताऱ्यातील असून, त्यांची ओळख पटली नाही.