Wednesday, February 8, 2023

कुर्लातील दोन तरुण मिठी नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील कुर्ला येथील दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले असल्याची घटना घडली असून माहिम दर्ग्यात दर्शनासाठी कुर्लाहुन गेले होते. काल मध्यरात्री घरी जात असताना, लघुशंकेसाठी दोन मित्र माहीम खाडीवर उभे होते. एकाचा पाय सरकल्याने एक मुलगा खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता दोघेही पाण्यात बुडाले.

दरम्यान, बुडालेल्या दोन तरुणांचा शोध पोलिसांनी घेतला असता एकाची बॉडी किनाऱ्यावर सापडली आहे, तर दुसऱ्याची अद्याप मिळालेली नाही. मुंंबईत पाऊस असल्याने दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाच्या शोधकार्यात पोलिसांना अडचणी येत आहे.

- Advertisement -

मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथून आलेला एक युवक पाण्यात पाय घसरून पडला. त्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. वैभव देसाई असे या तरुणाचे नाव आहे. तो मित्रासोबत कुंडमळा परिसरात आला होता. दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असताना देखील मित्रांसोबत तो पाण्यात उतरला होता. या प्रवाहात तो अचानकपणे वाहून गेला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.