Tymal Mills On Porn Site : मुंबईच्या माजी खेळाडूची पॉर्न साइटवर एंट्री; क्रिकेटविश्वात खळबळ!!

Tymal Mills On Porn Site
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tymal Mills On Porn Site। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये एकेकाळी मुंबई इंडियसचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू टायमल मिल्स याने अडल्ट साइटवर एंट्री केली आहे. टायमल मिल्सने एका पॉर्न साईटवर त्याचे अकाउंट तयार केले आहे, त्यामुळे क्रिकेट विश्वास मोठी खळबळ उडाली आहे. टायटल मिल्स पॉर्नस्टार होतोय कि काय अशा चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरु झाल्या, पण जेव्हा या विषयाच्या खोलात गेलं असता एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण? Tymal Mills On Porn Site

टायमल मिल्सने ‘Only Fans’या अडल्ट साईटवर त्याच अकाउंट उघडलं आहे. याबाबत टायटल मिल्सने स्वतः सांगितले की त्याला या साईटबद्दल लोक काय विचार करतात हे माहित आहे, परंतु त्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. या अकाउंटवर कोणतेही अश्लील फोटो किंवा ग्लॅमर फोटो मी शेअर करणार नाही, तर त्याचा क्रिकेट प्रवास आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव आपण या साईटवर (Tymal Mills On Porn Site) शेअर करेन असं टायमल मिल्सने म्हंटल आहे. चाहत्यांशी जोडण्याचा हा एक नवीन मार्ग आहे, मी या साईटच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे. मी या प्लॅटफॉर्मचा वापर एक माध्यम म्हणून करू शकतो असं टायमल मिल्सने स्पष्ट केलं. खरं तर, जेव्हा टायमल मिल्सने एसेक्ससाठी खेळायला सुरुवात केली तेव्हा तो क्रीडा पत्रकारितेचाही अभ्यास करत होता.

IPL मध्ये 2 संघाचा भाग –

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला टायमल मिल्स हा स्लोवर बॉल आणि डेथ ओव्हर साठी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. गरजेच्या वेळी तो बॅटिंग सुद्धा करू शकतो. मिल्सने इंग्लंडसाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. टायमल मिल्स आयपीएल मध्ये सुद्धा २ संघाचा भाग बनला आहे. त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या २ संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला १२ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यावेळी त्याने ५ सामन्यात ५ बळी घेतले. त्यानंतर ५ वर्षांनी २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सला १.५ कोटी रुपयांत संघात सामील करून घेतलं, मात्र तिथेही त्याला आपल्या कामगिरीत छाप पाडता आली नाही. ५ सामन्यांमध्ये तो फक्त ६ विकेट्स घेऊ शकला.