आमचा अंत पाहू नका; हल्ल्यानंतर उदय सामंतांचा शिवसेनेला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर सामंत यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल, शांत आहे म्हणजे हतबल नाही, आमचा अंत पाहू नका अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र. असे ट्विट उदय सामंत यांनी केलं. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही. त्यामुळे प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय झालं ??

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल पुण्यातील कात्रज चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत हे तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गद्दार गद्दार म्हणत सामंतांच्या गाडीची काच फोडली. सुदैवाने या हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले