निवडणूक महत्वाच्या कि महापुरुषांची बदनामी हे सांगा; उदयनराजेंचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आज खा. उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. “असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी. निवडणूका महत्वाच्या कि महापुरुषांची बदनामी हे सरकारने सांगावे? असा सवाल करत उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

खा. उदयनराजे भोसले उद्या रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी जी भूमिक घेत आहे, ती कोणाच्या विरोधात नाही, तर वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात आहे.

मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. जर आज मी या विरोधात आवाज उठवला नाही, तर मला स्वत:ला शिवरायांचे वंशज म्हणण्याचा अधिकार नाही, अनेक महापुरुष आहेत, ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी आपले आयुष्य वेचले. मात्र, आज काही मुठभर लोकं त्यांचा अवमान करत असतील, तर तो अवमान मी सहन करू शकत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

मी आज रायगडला जाणार आहे. उद्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलेन. पण या या सरकारकडून अजूनही राज्यपालांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. या सरकारला निवडणुका महत्वाच्या आहे कि महापुरुषांची बदनामी हे एकदाचे सांगून टाकावे, असा सवाल उदयनराजे यांनी केला.

असं वाटतंय तलवार घेऊन मुंडकी छाटून टाकू : उदयनराजे भोसले

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांबाबत असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते, असे उदयनराजे यांनी म्हंटले.