उदयनराजेंसह भाजपचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला; राज्यपालांविरोधात करणार तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. राज्यभरातून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्यासह भाजपचे पाच खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यावेळी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जाणार आहे.

खा. उदयनराजे भोसले हे दिल्लीत असून त्यांच्याकडून राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. रायगड येथे माध्यमांशी संवाद साधत उदयनराजेंनी राजकीय नेत्यांना थेट सवाल केला होता.

दरम्यान, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन खा. उदयनराजे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यपालांविरोधात नुकतेच एक आक्रोश आंदोलन केले होते. तसेच राज्य सरकारकडून राज्यपालांचा राजीनामा न घेतल्यास याविरोधात आझाद मैदानात एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्यासह कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक व इतर चार भाजपचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत.