हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. सध्या याठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) प्रबळ दावेदार असले तरी भाजपने अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही, तर दुसरीकडे अजित पवार गट सुद्धा साताऱ्यासाठी आग्रही असून लोकसभेसाठी रामराजे नाईक निंबाळकर किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याना उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्याच दरम्यान, आता उदयनराजे यांचे एक विधान चर्चेत आलं आहे. तिकिटाचे मला काय माहित नाही, पण मी काय सन्यास घेणार नाही असं उदयनराजे यांनी म्हंटल. त्यामुळे जर तिकीट मिळालं नाही तर उदयनराजे अपक्ष लढणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात..
सातारा येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटत कि आपल्याला तिकीट मिळायला पाहिजे, आणि ते रास्त आहे, त्यात चुकीचं असं काहीही नाही . आता जे काही ठरेल त्यावर बघू, पण एवढच सांगतो कि मी काय सन्यास घेणार नाही…. उदयनराजे यांच्या या विधानाने ते वेगळी काय भूमिका घेणार का? किंवा अपक्ष निवडणूक लढवणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. उदयनराजेंच्या या विधानावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
अजित पवारांकडून रामराजे सातारा लोकसभेच्या रिंगणात ?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सुद्धा सातारा लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहेत. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून जिल्ह्यात पक्षाची ताकद असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवार साताऱ्याची जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषदेचे उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर किंवा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील या दोघांपैकी एकाला अजित पवार उमेदवारी देऊ शकतात अशा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. आता साताऱ्याच्या हाय वोल्टेज जागेचा तिढा महायुती कसा सोडवणार ते पाहायला हवं.