हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून औरंगजेबासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. आता हा वाद वाढत निघाला असून , हिंदू सेवक असो किंवा बाकी कार्यकर्त्ते फेटून उठले आहेत. अनेकांनी औरंगजेबासंदर्भात तीव्र टीका केल्या आहेत अन आता खासदार उदयनराजे भोसले यांनीही एका पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि , “औरंगजेब हा इथला नव्हता, तर तो एक लुटेरा होता. त्याचे कबरीचे उदात्तीकरण का करायचे? त्यावर जेसीबी लावून ती उखडून टाका.” तसेच जे लोक महापुरुषांची बदनामी करतात त्यांच्या विरोधात कडक कायदा आणावा , अशी देखील मागणी केल्याचे दिसून येत आहे.
इतिहास जपण्याच्या महत्त्वावर जोर –
उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला आणि त्यांचा इतिहास जपण्याच्या महत्त्वावर जोर दिला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीचे श्रद्धास्थान जपण्याचा प्रयत्न केला. मात्र, औरंगजेबाने उलट त्याच्या कृत्यांद्वारे समाजाची धार्मिक एकता खंडित केली.” त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला कि , “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर दाखवला आहे. त्यासाठी विधानसभेत महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा मंजूर करावा. हा कायदा लागू न केल्यास, राज्यातील जनता सत्ताधारी पक्षांना याची गोडी चाखायला सोडणार नाही.”
महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई –
उदयनराजे भोसले म्हणतात कि, विकृत मानसिकतेच्या लोकांवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली. “सतत शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अवहेलना केली जात आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होतो आणि दंगल घडते. त्यासाठी महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात विशेष कायदा झाला पाहिजे,” अशी त्यांची मागणी होती. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे महापुरुषांच्या गौरव आणि इतिहासाच्या सत्यतेवर एक नवीन चर्चा उभी राहिली आहे.