उदयनराजे म्हणतात डॉल्बी वाजणारच, तर शंभूराजेंनी दिला कारवाईचा इशारा; साताऱ्यात पुन्हा राडा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात मतभेद पाहायला मिळाले. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर ‘अरे ला कारे’ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. तर दुसरीकडे कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देत शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई, पुण्यात डॉल्बी वाजविला जात असताना साताऱ्यात याला का बंदी? असा सवाल करत डॉल्बी नियमात राहून वाजवावा, असं उदयनराजे भोसले यांनी म्हंटले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल आहे, १२ वाजेपर्यंत मिरवणूक काढायची आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ती तशीच रस्त्यावर सोडायची हे कोंणत्या नियमात बसते. तुम्ही सलग मिरवणूक काढा आणि डेसिबल च्या हिशोबाने डॉल्बी लावा असं उदयन राजेंनी म्हंटल.

त्यावर प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई यांनी कारवाईचा इशारा दिला शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये अशी रास्त अपेक्षा आहे. डॉल्बीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी तथापि एखादी बाब करुच नये यासाठी एका मर्यादेपलीकडे अट्टाहास करु नये, गणेश मंडळांना गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होणार नाही अशी दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी आवाहनात्मक सूचना आज प्रशासन आणि सर्व संबंधीतांना केली आहे अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.