रयत मध्ये शरद पवारांनी राजकारण केलं; नाव न घेता उदयनराजेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कर्मवीर अण्णांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेत राजकारणात करण्यात आलं असं म्हणत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे. उदयनराजेंनी आज रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक प्राध्यापकांच्या आंदोलनाला भेट दिली यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील शरद पवारांचा हस्तक्षेपावर टिका केली आहे

उदयनराजे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची उभारणी ज्या संकल्पेनेतून झाली, त्यामध्ये सातारच्या राजघराण्याचा सिंहाचा वाटा होता. परंतु अण्णांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेत राजकारण झाल्याचे पाहायला मिळतं. खरं तर उपेक्षित जो वर्ग आहे याना शिक्षणाचे दालन खुलं राहिले पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी जो कोणी राज्याचा मुख्यमंत्री असेल तो रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल असं रयतच्या मूळ घटनेत होत. मात्र त्यांनतर संस्थेत बरेच बदल झाले. ज्यांचे काही योगदान नाही अशा लोकांनाही रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीत घेण्यात आलं

काही मुठंभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं आणि यामुळेच प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे असा आरोप उदयनराजेंनी केला. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राज घराण्याचा मोठा वाटा आहे मात्र आता रयतच्या संचालक मंडळाच्या बाॅडीत योगदान नसाणा-यांना सुद्धा घेतलं गेलय अशी खंत व्यक्त करत उदयरानराजे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.